मालेगाव – शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. मालेगाव शहर व तालुक्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसिव्हर व ऑक्सीजनचे सिलेंडर उपलब्ध व्हावेत. ही वेळ राजकारणाची नाही. राजकीय मतभेद बाजुला ठेवुन रुग्णास व जनतेस धीर द्या. कोरोना आजार उपचाराच्या माहितीसंदर्भात प्रशासनाने जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. रमजान पर्वाचा विचार करता मुस्लीम बांधवांना आवश्यक सोयी त्यांच्या घराजवळ उपलब्ध करुन देणेबाबत नियोजन करावे, असे राजेंद्र भोसले म्हणाले. प्रशासनाला गरज वाटल्यास आमच्या शैक्षणिक संस्थेच्या इमारती आम्ही उपलब्ध करुन देव् असे आश्वासन प्रसाद हिरे यांनी दिले.
मोसमपुल परिसरातील नागरीकांच्या सुविधांसाठी वॉररुम सुरु करुन या मध्ये वैद्यकीय विभाग, पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत कराव्यात व महापालिकेने एक लिंक तयार करुन शहर व ग्रामीण भागात असलेल्या रेमेडेसिव्हर इंजेक्शन, बेडची उपलब्धतेची माहिती दररोज जनतेस उपलब्ध करुन द्यावी असे आदेश ना. भुसे यांनी दिले. बैठकीत डॉ.खालीद परवेज, देवा पाटील, नितीन पोफळे, सुरेश निकम, दिलीप आहिरे, संजय दुसाने, प्रमोद पाटील, अन्सारी असलम यांनी महत्वाच्या सुचना मांडल्या. या बैठकीत प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, रामा मिस्तरी, दिनेश ठाकरे, सुनिल देवरे, दिलीप आहिरे, निलेश पाटील, निलेश आहेर, प्रमोद पाटील, भारत चव्हाण, नरेंद्र सोनवणे, भिकन शेळके, मनोज शहा आदींसह सर्व पक्षिय पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकरी डॉ. विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते.