मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या. प्रारंभी येथील मोसम पुलावरील गांधी पुतळ्याला जेष्ठ सेवा दल सैनिक अशोक पठाडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर प्रमुख दिनेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येऊन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राज्य संघटक नचिकेत कोळपकर, जिल्हा संघटक रविराज सोनार, अॅड मनोज चव्हाण, राजीव वडगे, काॅंग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर वांद्रे, सोहेल डालरीया, शरिफ मन्सुरी, इम्रान रशीद, नफिस मेहता, नबाब मन्सुरी, साहिल मन्सुरी, वाजीद काॅम्रेड, बापू देवकाते, अन्सारी सर्जन, अकिल शेख, मुबस्सीर अन्सारी आदी यावेळी उपस्थित होते.