मालेगाव उप वनविभाग व विशेष पोलीस पथकाची सयूंक्त कारवाई
…..
मालेगाव – येथील उप वनविभाग व विशेष पोलीस पथकाच्या संयुक्त कार्यवाहीत महापालिकेच्या हद्दीतील दरेंगाव शिवारात छापा टाकून तीन आरोपीसह दोन हरणांचे सुमारे २० ते २५ किलो मांस एक दुचाकी मोटरसायकल व वजनकाटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी याना गुप्त माहिती मिळाली की, मालेगाव शहराजवळील दरेगाव भागात काही इसम हरणांचे मांस विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे खांडवी यांनी आपल्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे यांना वनविभागाशी संपर्क करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.
याप्रमाणे मालेगावचे उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व पोलीस उपनिरीक्षक घुगे यांच्या संयुक्त पथकाने दरेंगाव शिवारातील गट नंबर ६८ मधील निळ्या व पांढऱ्या रंगाचे पत्र्याच्या शेड मध्ये छापा टाकला असता तेथे आरोपी मुद्स्सीर अहमद अकिल अहमद (वय 37 रा चुनभूट्टी बेलबाग ), शेख शब्बीर शेख रजाक (वय ४१ रा गल्ली नंबर 3 कमालपुरा ) ,सैय्यद मुबिन सैयद हारून (वय ४३ रा सर्वे न १५ कमालपुरा) सर्व राहणार मालेगाव जिल्हा नाशिक हे चिंकारा जातीचे हरणांची शिकार करून आणलेले मांसा च्या तुकड्यासह आढळून आले.आरोपी विरुद्ध वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८ अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे .
त्यांच्या ताब्यातून मांसाचे मोठया आकाराचे ९ तुकडे, होंडा कंपनीची काळ्या रंगांची दुचाकी, कुंदा ( लाकडी ठोकळा) असा सुमारे १ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या संयुक्त कारवाईत वनविभागाचे वनपाल आर व्ही देवरे, बी एस सुर्यवंशी, वनरक्षक एस बी शिर्के, आगार रक्षक आर के बागुल, रफिक पठाण, टी जी देसाई, विशेष पोलीस पथकातील पोलीस हवालदार वसंत महाले, विकास शिरोळे, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, भूषण खैरनार, पंकज भोये आदी सहभागी होते. अधिक तपास उपविभागीय वन अधिकारी येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास डी. कांबळे करीत आहेत.