कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येनंतर महापौर ताहेरा शेख यांनी घेतली पत्रकार परिषद
मालेगाव – मालेगाव महापालिकेने शहरातील सर्व शाळा ,महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लास ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापौर ताहेरा शेख यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावकरांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मालेगाव पॅटर्नचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र आता दुसऱ्या लाटेत मालेगावात कोरोनाने पाय पसरायला सुरवात केली आहे. दररोज २० ते २५ रुग्णांची भर पडत असल्याने कोरोना रुग्णांचा आकडा ३५० वर पोहचला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार बघता महापालिकेने शाळा, महाविद्यालय,खाजगी कलासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगावात कोरोना प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्याची गरज असल्याचे महापौर यांनी सांगितले.