नाशिक – मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोसावी हे बुधवारी आपला पदभार घेणार आहे. यापूर्वी गोसावी यांनी जिल्ह्यात मनमाड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुख्याधिकारी, उपायुक्तसह विविध पदावर काम केले आहे. मुळचे नाशिकरोड येथील रहिवाशी असलेले गोसावी हे कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात.
मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी धनजंय निकम यांच्याकडे तूर्त आय़ुक्तपदाचा प्रभारी पदभार आहे. त्यामुळे ते गोसावी यांच्याकडे हा पदभार देतील. राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी (मुख्याधिकारी गट अ) जिल्हा प्रशासन अधिकारी नाशिक या पदावरुन गोसावी यांची नियुक्ती केली आहे.