मालेगाव:- सर्व धर्मीय मंदिरे उघडणे व कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदू रक्षक धर्म परिषद धार्मिक व सामाजिक संघटनेच्यावतीने मालेगाव नायब तहसिलदार सोमनाथ खैरे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महामारीमुळे मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत शासनाने लॉकडाऊन केलेला होता. त्यानंतर अनलॉक करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली. त्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.पण, मंदिरे व अन्य पार्थना स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. मंदिराजवळील प्रसाद विक्रेते, फुलहार विक्रेते तसेच अन्य व्यावसायिक यांच्या रोजीरोटीचा प्रश्न फारच गंभीर झालेला आहे. त्याचप्रमाणे कीर्तनकार मंडळींना ही कीर्तन सेवा बंद असल्यामुळे फारच बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सर्वांनवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वसाधारण मूलभूत गरजा ही भागविणे अवघड झाले आहे.
तरी,शासनाने आमच्या या मागण्यांचा गंभीरपणे विचार करून लवकरात लवकर सर्व मंदिरे, धार्मिक पार्थना स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, व सामाजिक कीर्तने,प्रवचने, अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यास परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. परवाणगी न दिल्यास संघटनेतर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प.श्री. अवचितानंद महाराज उर्फ मधुकर आहिरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव हिंदू रक्षक धर्म परिषदेचे तालुका संघटक हभप रवींद्र महाराज सुर्यवंशी, बजरंग शक्ती सेना अध्यक्ष हभप सोपान शेवाळे, शहराध्यक्ष हभप परीक्षित पाटील, कार्याध्यक्ष मंगेश बच्छाव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती बागुल, संघटक शंकर आहिरे, संपर्क प्रमुख जयदीप पवार यांनी निवेदना द्वारे दिला आहे.