मालेगाव- सिटी मालेगाव क्रिकेट असोसिएशनच्या (सीएमसीए) वतीने दिवंगत बुलंद इक्बाल यांच्या स्मृतीनिमित्त अजीज कल्लू स्टेडियमवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम फेरी १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान होईल. मुंबई, पुणे यासारख्या शहरांचे प्रसिद्ध संघ तसेच जयपूर, औरंगाबाद, धूळे नाशिक, भुसावळ येथील संघानी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
अनेक स्पर्धक रणजी करंडक खेळाडू आपापल्या संघासमवेत या स्पर्धेत खेळण्यासाठी मालेगाव येथे आले आहेत. या सर्व खेळाडूंना सिटी मालेगाव क्रिकेट असोसिएशनतर्फे जेवण आणि निवास व्यवस्था देण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण ५१ सामने होणार आहेत. ही स्पर्धा सुमारे २४ संघांदरम्यान खेळली जाणार असून पाच संघ मालेगाव शहरातील असून उर्वरित बाहेरील शहर व इतर राज्यांतील या स्पर्धेचे प्रायोजक प राजधानी बुटीक व इतर संस्था आहेत. आरोग्य व तंदुरुस्ती टिकवण्यासाठी शहरातील तरुणांनी खेळामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे, अब्दुल अझिज कल्लू स्टेडियमवर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत जेणेकरुन तरुण क्रिकेट व खेळाशी जोडलेले राहू शकतील व निरोगी राहतील.
असोसिएशनच्या अधिका-यांनी पत्रकारांना सांगितले की, स्पर्धा संपल्यानंतर नाईट टूर्नामेंट लवकरच सुरू होईल. उल्लेखनीय आहे की या स्पर्धेतील पहिले पुरस्कार १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार ६६ हजार रुपये आहे. मालेगाव क्रिकेट असोसिएशन तसेच जनता दल सेक्युलरचे कार्यकर्तेही या स्पर्धेत सहकार्य करताना दिसत आहेत.