मालेगाव – मालेगाव तालुक्यातील पाटणे गावातील कोरोनाचा वाढता धोका कमी करण्यासाठी तसेच कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पाटणे प्राथमिक आरोग्य उपकेद्रात ४८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक नागरिक अँटीजेन चाचणीत बाधित निघाला असून गावातील एकुण बाधितांची संख्या ३५ झाली आहे.
लसीकरणाचा प्रारंभ सरपंच राहुलाबाई आहिरे, माजी प्राचार्य बी. के. अहिरे, माजी सरपंच नथू खैरनार, अशोक वाघ, संदेश खैरनार, माजी सरपंच नंदा आहिरे, प्राथमिक आरोग्य केद्रांच्या आरोग्यधिकारी डाॅ. सारिका मेरगळ, पाटणे उपकेद्रांच्या प्रमुख डॉ. वैशाली मंडलिक, पोलीस पाटील रवींद्र खैरनार, राजेश धनवट, संदीप बागुल, नानाभाऊ निकम, कारभारी पवार, आरोग्यसेविका सुरेखा देवरे, आरोग्य सेवक अरुण पाटील, मनिषा त्रिभुवन, कविता खैरनार, जयश्री विखे, वैशाली बागुल आदी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला.
आरोग्य अधिकारी डाॅ. मेरगळ यांनी लसीकरण मोहीमे विषयी सविस्तर माहिती दिली. माजी प्राचार्य आहिरे यांनी कोविशील्ड ही लस नागरिकांसाठी पूर्णतः सुरक्षित असून लसीकरणाला न घाबरता सर्वांनी वेळेवर लसीकरण करून आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नागरिकांची प्रथमता अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यांनतर तापमान, पल्स, ऑक्सिजन लेवल आदी तपासणी करण्यात आली. मगच लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुपार पर्यंत ५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले होते.