मालेगाव – मालेगाव परिसरातील होम क्वारंटाईनअसलेल्या कोविडबाधित रुग्ण यांच्या हातावर पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने होम कॉरोंटीएनचे शिक्के आशा सेविकांनी मारणे सुरु केले आहे. काल झालेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे व ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त धनंजय निकम यांच्यासह सर्व अधिकारी यांच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे.