मालेगाव – सटाणा नाका परिसरातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्रीच्या सुमारास केला. एटीएमचे शटर उचकऊन चोरट्यांनी आता प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी धाव घेत एटीएमची पाहणी करत ते सिल केले. एटीएममधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे. एटीएम मधून पैसे चोरीला गेले की नाही अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र एटीएम मध्ये दहा लाखाची कॅश असल्याचे बॅकेच्या अधिका-यांनी सांगितले.