मालेगाव – कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून रविवारी मालेगाव शहरात माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत व योगा सादरीकरण करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांची शारीरिक रोग प्रतिकार शक्ती वाढावी या उद्देशाने मसगा महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आला. या कार्यक्रमाला मालेगावकरानी भरपूर आनंद घेतला.
या सामुहिक कवायतीमध्ये यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय सोनवणे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, माजी महापौर रशिद शेख, उपमहापौर निलेश आहेर, यांच्यासह नगरसेवक सुनिल गायकवाड, राजाराम जाधव, जयप्रकाश बच्छाव, नगरसेविका पुष्पा गंगावणे, राजेश गंगावणे, विनोद वाघ, नितीन पोफळे, छायाताई शेवाळे, उषा देवरे, रंजना थोरात, मनिषा ब्राम्हणकर, सोहम योगा अकादमी, स्मार्ट क्लब, महिला संघटना, सामाजिक संघटना, लहान मुले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले तर आभार शशी निकम यांनी मानले.
Health is wealth, increase your immunity through daily exercise ????