मालेगाव – दाभाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त भाजपाच्या सरपंच चारुशिला अमोल निकम यांच्या विरोधात बुधवारी अविश्वास मंजुर झाला. लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे त्यासाठी ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले. निकम यांच्या विरोधात अनेत तक्रारी करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सकाळी मतदार नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्षात दुपारी मतदान घेण्यात आले. त्यात ५ हजार ६५ मतदारांनी मतदान केले. यात हा अविश्वास ठराव मंजुर झाला.