मुंबई – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मौजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकुलातील देण्याचा निर्णय आज (२६ ऑग्स्ट) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या संकुलात शासकीय कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येईल. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यास तसेच यासाठी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर अशा ७६ पदांना देखील मान्यता देण्यात आली. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येईल. या सर्वांसाठी ७० कोटी रुपये खर्च येईल.
भुसेंचे प्रयत्न
शिवसेना नेते आणि कृषीमंत्री दादा भुसे हे मालेगाव तालुक्यातील दाभाडी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या मतदारसंघात अशा प्रकारचे कृषी संकुल असावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार कृषी विभागाने तसा प्रस्ताव तयार केला. त्यास आता मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.