मालेगाव: तालुक्यातील कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय नवीन जागेत स्थलांतर झाले असून शासकीय तंत्र निकेतन विद्यालय व आयटीआय कॉलेजच्याआवारात कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाजवळ, कॅम्प रोड मालेगाव येथील नवीन जागेत या कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्याची माहिती उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.
महिला शेतकरी मेळाव्या प्रसंगी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या नुतन वास्तुचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला होता, तथापी आज गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ शिंदे , तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण शिंदे, भास्कर जाधव, प्रमोद निकम, निळकंठ निकम यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी, प्राध्यापक व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत आज नुतन कार्यालयात कामकाजास सुरूवात झाली असून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसह सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहनही उप विभागीय कृषी अधिकारी श्री.देवरे यांनी केले आहे.