मालेगाव – मालेगावमधील नागरिकांचे चित्रपट वेड नवीन नाही, येथे हिरोच्या नावाने फॅनचे ग्रुप आहे. पण, आता हे वेड या फॅनच्या अंगलट आले आहे. दहा दिवसापूर्वी शहरातील सेंट्रल चित्रपटगृहात करण अर्जून हा जुनाच चित्रपट सुरु असतांना सलमा खान व शाहरुख खान यांच्या फॅननी थेट चित्रपट गृहात फटाके फोडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सुध्दा सर्वत्र व्हायरल झाला होता. पण, त्याविरोधात कारवाई झाली नव्हती. पण, काल फटाके फोडणा-या विरोधात चित्रपटगृह व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या फॅनचा हा फटाके फोडण्याचा उत्साह आता अंगलट आला आहे.
मालेगाव मध्ये नवीन चित्रपट आला की त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असतात.आणि त्याची पडद्यावर एन्ट्री होताच काही उत्साही चाहते आपला आनंदही व्यक्त करत असतात. पण, चित्रपटगृहातच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याची घटना गंभीर ठरली आहे. सलमान खानच्या ट्युबलाईट हा सिनेमा प्रर्दशित झाल्यानंतर असाच प्रकार घडला होता. विशेष म्हणजे कोरोनामुळे थिएटर बंद होते. त्यानंतर ते सुरु झाले. पण, त्यात नवीन चित्रपट अद्याप नाही. त्यामुळे जुन्याच चित्रपटासाठी हा जल्लोष झाला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!