मालेगाव – गुन्हेगारांची वाढती दहशत मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने चार सराईत गुन्हेगारांचे तीन जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी पारित केले आहेत. यातील दोन गुन्हेगारांना एर वर्षाकरिता तर दोन गुन्हेगारांना दोन वर्षाकरिता नाशिक, धुळे व जळगाव या तीनही जिल्हयातून हद्दपार करण्यात आल्याचे उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी कळविले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या चारही गुन्हेगारांना कलम ५६ (१) (ब) अन्वये हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले असून यात अफजल खान इकबाल खान ऊर्फ आतडी व रविंद्र बुधा कुवर यांना प्रत्येकी एक वर्ष तर शहेबाज अहमद मोहंमद युसूफ ऊर्फ कमांडो व मुसद्दीक अहमद खुर्शीद अहमद ऊर्फ मुसा या दोघांना दोन वर्षासाठी नाशिक, धुळे व जळगाव या तीनही जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. जारी करण्यात आलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी पोलीस प्रशासनास दिले आहेत.