मालेगाव – शहरातील दी मालेगाव मर्चंट्स को. ऑप बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष भरत पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी सभेस संचालक राजेंद्र भोसले, शरद दुसाने, नरेंद्र सोनवणे, दादा वाघ, सतीश कलंत्री, नंदू सोयागावकर, सतीश कासलीवाल, गौतम शाह, विठ्ठल बागुल, भिका कोतकर, मनीषा देवरे, छगन बागुल, उपेंद्र मेहता, भास्कर पाटील, बँक अधिकारी राधेशाम जाजू, मिलिंद गवांदे, वीरेंद्र होणराव उपस्थित होते.
कोरोना संकटाच्या काळात शहराचे अर्थचक्र सुरु राहावे व छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने बँकेने मामको आधार लघु कर्ज योजना राबविली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत २ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केल्याचे व्हा.चेअरमन संजय दुसाने यांनी सांगितले. बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात १ कोटी ४१ लाख ९१ हजार निव्वळ नफा झाला आहे. बँकेचा एकूण निधी ३० कोटी १९ लाख तर गुंतवणूक १२८ कोटी ३६ लाख आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत बँकेला एनपीए कमी राखण्यात यश आले आहे. निव्वळ एनपीए ८.१२ टक्के इतका आहे. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, वर्धमाननगर शाखा स्वमालकीची केली आहे. तसेच सटाणा रोड शाखेच्या जागेची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. शहराचा विस्तार बघता भविष्यात मनमाड चौफुली व चाळीसगाव फाटा येथे शाखा सुरु करण्याचा मानस आहे.