मालेगाव – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात आता सातच्या आत घरात हा नियम लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लागू असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून (१८ ऑगस्ट) सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मालेगावमध्ये वाढत आहे. तो रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगावमध्ये गणेशोत्सव, मोहरम आणि कोरोना स्थिती या संदर्भात बैठक घेण्यात आली. पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.