मालेगांव – भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश निकम व जिल्हा प्रभारी शशिकांत वाणी यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी करत आंदोलन केले. वीज बिलात सवलत मिळावी यासाठी भाजपतर्फे राज्यभर हे आंदोलन सरकार विरोधात करण्यात येत आहे. या आंदोलनात मालेगांव जिल्हा प्रभारी डॉ. शशिकांतजी वाणी, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम, संघटन सरचिटणीस देवाभाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसादजी गुप्ता, उपाध्यक्ष नंदू तात्या सोयगांवकर,नाना मराठे, प्रज्ञा सेल संयोजक भरत पोफळे, सहकार आघाडी अध्यक्ष यू. आर. अण्णा पाटील, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष पोपटनांना लोंढे, नगरसेवक संजयजी भाऊ काळे, जिल्हा कोषाध्यक्ष सुधीर जाधव, मालेगांव पूर्व मंडळ अध्यक्ष सलीम पिंजारी, उत्तर भारतीय आघाडी राजेश वाजपेयी, आदिवासी मोर्चा उपाध्यक्ष देविदास शेठ कुवर, जिल्हा चिटणीस हेमंतजी पूरकर, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा सुनीलजी शेलार, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्याम गांगुर्डे, सांस्कृतिक आघाडी तालुका अध्यक्ष पप्पु पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य गोविंदजी राजपूत, नंदकिशोरजी शर्मा, भोगीलालजी पटेल, बापू निकम, प्रकाश मुळे, बापू सूर्यवंशी, शक्ती सौदे, रवींद्र जाधव. युवा मोर्चा कार्यकर्ते राहुल आघारकर, पंकज दुसाने यांनी सहभाग घेतला.