मालेगाव – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर करुन जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, आता त्याला राज्यभरातून विरोध होऊ लागला आहे. मालेगाव येथे गुरुवारी एमआयएम थेट रस्त्यावर उतरुन त्यांनी No More Lock Down चे बँनर झळकावत डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एमआयएमचे नगरसेवक खालीद परवेज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मात्र कोरोनाचे नियम व निर्बंधाकडे आंदोलनकर्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे आंदोलन चर्चेचे ठरले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!