मालेगाव – काल दिलेल्या निर्देशानुसार कोरोना आजाराचा संसर्ग थांबेपर्यंत मोहन थेटर आजपासून बंद करण्यात आले. प्रभाग अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित राहून कारवाई केली. ज्या ज्या ठिकाणी आता उल्लंघन दिसेल तिथे अशीच कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वी मोहन थिएटरमध्ये नवीन चित्रपट बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आज मोहन थिएटर बंद करण्याची कारवाई केली.