मालेगाव : येथील भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ आयोजित शिवगानस्पर्धा २०२१ स्पर्धेला मालेगावकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. संपूर्ण महाराष्ट्रात भरतमुनी जयंती निमित्ताने शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मालेगावात जिल्हाध्यक्ष सुरेश निकम व सांस्कृतिक प्रकोष्ट जिल्हा संयोजक सतीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाने श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय (अॅरोमो थिएटर) येथे शिवगानस्पर्धा संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आख्यायिका सांगणारे गीत, पोहाडे अभंग यांची चांगलीच जुगलबंदी बघावयास मिळाली. बालकाराकारांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धेत सांघिक गटात प्रथम क्रमांक चांदवड येथील स्वरांजली ग्रुप यांनी मिळविला तर द्वितीय श्री हिरामणभाऊ लोंढे ग्रुप व तृतीय श्री सदगुरु संगीत विद्यालय यांनी मिळविला त्याच प्रकारे वैयक्तिक गटात प्रथम राधिका हेमंत पाटील द्वितीय सचिन निकुंभे तृतीय नारायण शंकर महाजन हे विजेते ठरले. स्वयंसेवक संघ प्रचारक हर्षवर्धन भोसले व जिल्हा उपअध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उत्तर महाराष्ट्र विभाग सह संयोजक आशीष कासार, विशाल जाधव, जिल्हा संयोजक सतीश उपाध्याय तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, सांस्कृतिक तालुका संयोजक योगेंद्र पाटील, कोषाध्यक्ष सुधीर जाधव, हरिप्रसाद गुप्ता, बच्छाव, जिल्हा सहसंयोजक हरिशंकर दायमा, भूषण शिंदे, श्याम गांगुर्डे, सौरभ अक्कर यांनी परिश्रम घेतले.