मुंबई – चारचाकी खरेदी करणे तशी आता फारशी मोठी बाब राहिलेली नाही. मध्यमवर्गियांमध्ये तर कारचे फॅड चांगलेच वाढत आहे. त्यामुळेच ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये कमीत कमी किंमतीतील कार बाजारात आणण्याची चढाओढ लागली आहे. मारुती कंपनी देखील लवकरच दोन नव्या कार मार्केटमध्ये आणत असून त्यांची किंमतही ४ ते ५ लाखांच्या आसपास असणार आहे.
२०२१ हे वर्ष भारतातील ऑटोमोबाईलसाठी दमदार असणार आहे. कारण पुढील वर्षात भारतात मोठ्या प्रमाणात हॅचबॅक गाड्या दाखल होणार आहेत. भारत हे हॅचबॅक गाड्यांचे सर्वात मोठे मार्केट आहे. कारण यात खिशावर जास्त भार येत नाही आणि शहरातील वाहतुकीसाठीदेखील त्या चांगल्या असतात. भारतातील जवळपास प्रत्येक मोठ्या कार निर्मात्याच्या पोर्टफोलियोमध्ये एक हॅचबॅक कार नक्कीच असतेय मात्र प्रतिस्पर्धी आणि मागणी लक्षात घेता दरवर्षी या कार मार्केटमध्ये आणाव्या लागतात. मारुतीच्या अशाच दोन नव्या कारवर नजर टाकुया…
मारुती सेलेरिओ
न्यू जनरेशन मारुती सुझुकी सेलेरिओ चांगलीच लोकप्रिय आहे. ही कार कंपनी पुढील महिन्यात लॉन्च करीत आहे. या गाडीचे हे नवे मॉडेल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅचबॅकच्या डिझाईनमध्येही बरेच बदल बघायला मिळतील. तसेच नवी सेलेरिओ सध्याच्या मॉडेलपेक्षा लांब असेल. या कारची किंमतही ४ ते ६ लाखाच्या दरम्यान असणार आहे.
मारुती सुझुकी एक्सएल ५
मारुतीच्या या कारची एक्सएल ६च्या धर्तीवर तयार केले जात आहे. इर्टिगाचीच ती एक प्रिमियम आवृत्ती असणार आहे. एक्सएल ५ सात सीटचे वॅगनार असेल, अशीही एक अफवा आहे. मात्र ते प्रत्यक्ष लॉन्चिंगनंतरच स्पष्ट होईल. एक्सएल ५ ला वॅगनारच्या चेसीसवरच तयार केले जाणार आहे. ज्यात १.२ लीटर पेट्रोल युनीट मिळण्याची शक्यता आहे. या कारची किंमत ५ लाखापासून सुरू होईल, असा अंदाज आहे.