मानवतेचा कुंभमेळा – संत निरंकारी समागम
मागील ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत ‘७३वा वार्षिक निरंकारी संत समागम’यावर्षीजगाची वर्तमान परिस्थिति लक्षात घेऊन व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे. ज्याचा शुभारंभ शनिवार दिनांक ५ डिसेंबर, २०२० रोजी होत आहे. या संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक संस्कृती, सभ्यता आणि बहुरंगी छटांचे दर्शन होईल.
वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी पूर्ण समर्पित भावनेने व सजगतेने सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे (जोवर लस नाही, तोवर ढिलाई नाही) पालन करत केली गेली आहे. समागमामध्ये भाग घेतलेल्या भक्तगणांच्या बाबतीत थर्मल स्क्रीनिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग (दोन फूट अंतर, मास्कचा वापर) या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे.
यावर्षी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ यावर आधारित गीत, विचार, कवितायांचे प्रस्तुतीकरण समागमाच्या माध्यमातून केले जाईल. त्याचे रेकॉर्डिंग काही टीम मेम्बर्सना मिशनच्या दिल्ली मुख्यालयामध्ये बोलावून करण्यात आले आहे. याशिवाय देश-विदेशांत अगोदरच रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमांचा समावेश देखिल यामध्ये करण्यात आला आहे ज्याचे प्रसारण व्हर्च्युअल रुपात केले जाईल.
जरी हा संत समागम व्हर्च्युअल रुपात होत असला तरीयाला साकार रुप देण्यासाठी मिशनच्या वतीने रात्रंदिवस अथक प्रयास करण्यात आले आहेत जेणेकरुन जेव्हा याचे प्रसारण केले जाईल तेव्हा भक्तगणांना दरवर्षीप्रमाणे आपण प्रत्यक्ष समागमच पाहत आहोत अशी अनुभूती यावी. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाद्वारेच हे शक्य झाले आहे.
समागमाची ठळक वैशिष्ट्ये
समागमाचा प्रारंभ ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सत्संगाच्या रुपात होईल. ज्यामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपला ‘मानवतेच्या नावे संदेश’ (Message to Mankind) प्रेषित करतील. त्यानंतर सत्संग कार्यक्रमाच्या शेवटी रात्री ८.३० ते ९.०० वाजेपर्यंत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनाद्वारे आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील. समागमाचे प्रसारण तिन्ही दिवशीमिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी ४.३० से रात्री ९.०० वाजेपर्यंत तसेच संस्कार टी.व्ही.चॅनलवर सायंकाळी ५.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत प्रसारित करण्यात येईल.
सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंतसेवादल रॅली एका मुख्य आकर्षणाच्या रुपात मिशनच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. याशिवाय संस्कार टी.व्ही चॅनलवरही दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत या रॅलीचे प्रसारण केले जाईल.या रॅलीमध्ये भारतवर्ष तसेच विदेशातील सेवादल बंधु-भगिनी शारीरिक व्यायाम, खेळ, विविध कसरती तसेच मिशनच्या शिकवणुकीवर आधारित लघुनाटिका(Skits) कार्यक्रमाच्या स्वरुपात दर्शविण्यात येतील. ही रॅली सद्गुरु माताजींच्याआशीर्वचनांद्वारे संपन्न होईल.
याच दिवशी सायंकाळी ४.३० पासून सत्संग कार्यक्रम आयोजित होईल.सत्संग समारोहाच्या शेवटी रात्री ८.३० ते ९.०० या वेळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनांद्वारे समस्त भाविक-भक्तगणांना आपला आशीर्वाद प्रदान करतील.
बहुभाषी कवी दरबार
समागमाच्या तिसऱ्या दिवशी ७ डिसेंबरला सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सत्संग कार्यक्रम होईल ज्यामध्येमुख्य आकर्षण एक ‘बहुभाषी कवीसंमेलन’ हे राहील. कवी संमेलनात मुख्य शीर्षक ‘स्थिर प्रभुशी मनाला जोडू या, जीवन आपुले सहज करु या’ या विषयावरजगभरातील कवी सज्जन विविधभाषांमध्ये आपल्या शुभ भावना कवितांच्या माध्यमातून प्रस्तुत करतील. समागमाचेसमापन रात्री ८.३० ते ९.०० दरम्यान होणाऱ्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रवचनाने होईल.
निरंकारी प्रदर्शनी
मिशनचा इतिहास आणि विचारधारा विभिन्न मोड्यूल; चित्रेतसेचचलतचित्रांच्या माध्यमातूनदर्शविणारी ‘निरंकारी प्रदर्शनी’ व ‘बाल प्रदर्शनी’ समस्त भक्तांना आकर्षित करील. यावर्षीव्हर्च्युअल रुपात ही प्रदर्शनी समागमाच्या काही दिवस अगोदर मिशनच्या वेबसाईटवर दाखविण्यात येईल ज्याचा लाभ जगभरातील भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन घेऊ शकतील.
या समागमाचामुख्य उद्देश सत्य, प्रेम आणि एकत्वावर आधारित शांतिपूर्ण सह-अस्तित्वाने युक्त मानव समाजाची निर्मिती करणे तसेच आपल्या स्वभावामध्ये स्थिरतेचा अंगीकार करुन जीवन सहज सुंदर करणे हा आहे.