मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’साठी विशेष मोबाईल अॅप

by Gautam Sancheti
सप्टेंबर 15, 2020 | 10:43 am
in राज्य
0
cm meeting1

मुंबई – माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या माहितीचे विश्लेषण शक्य होणार आहे. तशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे ठाकरे यांनी  सांगितले. वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सोमवारी संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामस्वामी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आदींची उपस्थिती होती.

रोग होऊच न देणे

राज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की २०१४ मध्ये मी शिव आरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकूत असेही मुख्यमंत्री म्हणाले

ऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही

सध्या राज्यात १ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते. मात्र गरज ५०० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढोल काळात गरज पडू शकते असे डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका कियी उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा, असेही ते म्हणाले.

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील. या टँकसची वाहतूक रोखू नये तसेच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी दिली.

या मोहिमेसाठी सर्व पथकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कंगनाचा आदित्य ठाकरेंवर हा गंभीर आरोप; उद्धव यांनाही दिले आव्हान

Next Post

अँटीजेन चाचणी करायचीय? येथे सुरू आहेत केंद्र

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20200914 WA0021 e1600180208810

अँटीजेन चाचणी करायचीय? येथे सुरू आहेत केंद्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 43

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…रोहिणी खडसे यांची पोस्ट

जुलै 21, 2025
rain1

राज्यात आठवडाभर पावसाची असेल ही स्थिती, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जुलै 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अतिश्रम टाळून तब्येतीकडे लक्ष ठेवावे, जाणून घ्या, सोमवार, २१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

जुलै 19, 2025
पशुसंवर्धन विभाग 1001x1024 1

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती…४५८ कोटीची तरतूद

जुलै 19, 2025
Untitled 42

नाशिक जिल्हा जंपरोप स्पर्धा उत्साहात संपन्न…राज्य फेडरेशन चषक स्पर्धेचेही नाशिकमध्ये आयोजन

जुलै 19, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011