नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी माहिती दिली आहे. गेल्या दहा तारखेला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे कोमात असून, कृत्रिम श्वसन यंत्रणेसह विशेषज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. मुखर्जी यांना कोरोना विषाणूचा संसर्गही झालेला आहे.