नांदेड/औरंगाबाद – नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात स्वअस्तित्व निर्माण करीत प्रदिर्घकाळ सत्ता उपभोग व नांदेडच्या राजकारणातील एक सक्रिय राजकारणी म्हणून ओळखल्या जाणारे माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे रोजी औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
माजीमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणासह राज्यातील राजकारणात आपल्या नावाच्या अस्तित्वाचा एक वेगळा बोलबाला निर्माण करीत बिलोली पंचायत समितीचे पाहिले सभापती सलग १५ वर्षे नांदेड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भूषविले, बिलोली मतदार संघाचे आमदार, निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. नांदेड जिल्ह्याचे खासदार सहकार क्षेत्रात ही त्यांनी विविध पदे भूषविली होती. विशेष म्हणजे नुकतीच होऊ घातलेल्या नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. ज्यांचे पूर्ण आयुष्य सक्रिय राजकारण व समाजकारणात गेले अशा नेत्याच्या सहवासाला नांदेडकर पोरके झाले आहेत.