नाशिक – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या निमित्ताने शनिवार ६ मार्च रोजी नाशिक शहरात येत आहेत. सकाळी ९ वाजता शिवशक्ती चौक, सिडको, सकाळी ९.४५ वा.रथचक्र चौक, इंदिरानगर, १०.३० वा. दत्त चौक, नाशिक रोड, ११.१५ वा. वर्जेश्वरी देवी मंदिराजवळ, दिंडोरी रोड, पंचवटी येथील नाशिक मनपाच्या माध्यमातून होणाऱ्या रस्ते कामाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या शुभहस्ते होईल. तसेच दुपारी १२ वा.कालिदास कला मंदिर येथे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नविन १६ जलकुंभ बांधणे या कामांचा शुभारंभ ऑनलाईन पध्दतीने फडणवीस यांच्या शुभहस्ते होईल.
नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे आगामी काळात विविध मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहेत. या शुभारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.जयकुमार रावल, महापौर सतिष नाना कुलकणी, प्रदेश उपाध्यक्ष खा.भारती पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.ॲड. राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, विजय साने, सुहास फरांदे, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, गटनेते जगदीश पाटील, सभागृह नेते सतिष सोनवणे, यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नाशिककर नागरीकांनी कोरोनाचे नियमाचे पालन करून उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन पाटील आदींनी केले आहे.