नाशिक – राज्याच्या माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी वयाची नुकतीच नव्वदी ओलांडली आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यातच त्यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली आहेत.
पती व्यंकटराव हिरे यांच्यानंतर १९८५ मध्ये पुष्पाताई यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच जाऊ इंदिराबाई हिरे यांचा पराभव केला होता. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी आरोग्यमंत्रीपद भूषविले होते.