नाशिक – माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची शाळेशी नाळ जोडलेली असते. शाळेबद्दल असलेले प्रेम, आपुलकी, तसेच शिक्षकांबद्दल असलेला आदर कधीही कमी होत नाही, असेच उदाहरण आजच्या काळात देखील दिसून आले आहे.
मराठा हायस्कूल मधील मुख्याध्यापक श्री गुलाबराव भामरे सरांच्या आवाहनावरून जवळपास दीडशे हुन अधिक माजी डॉक्टर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेसाठी काहीतरी करण्याचे ठरविले व त्यासाठी सहकार तत्वातून निधी जमा केला. डॉक्टर असल्याने व आरोग्य विषयक उपक्रमाची जाण ठेऊन शाळेतील विध्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी यांसाठी सुमारे ७००लिटर प्रति तास शुद्ध पाणी तयार करणारे आर ओ फिल्टर या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी देणगी म्हणून दिले. मराठा विद्या प्रसारक समाज्याच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या हस्ते या प्लांट चे उदघाटन करण्यात आले, यावेळी बोलताना पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वानी याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी नाशिक मधील स्पाईन अँड पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ व स्त्रीरोग तज्ञ डॉ. अजित तिदमे यांनी पुढाकार घेतला, शाळेसाठी व शाळेतील गरजू विद्यार्थी यांना पुढील काळात देखिल मदत करण्याचे त्यानी आश्वासन दिले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाबराव भामरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डॉ योगेश भदाणे, डॉ हेमंत सोनानीस, डॉ सचिन वाघ, डॉ सुशील गवळी, डॉ सपना तांदळे, डॉ नितीन पाळेकर, डॉ तेजश्री पाटेकर, इंजिनीअर आकाश ठाकरे आदी उपस्थित होते. सदर करोना काळात सोशल डिस्टन्स पाळून साध्या पद्धतीने हा समारंभ पार पाडण्यात आला. या उपक्रमाबद्दल सर्व माजी डॉक्टर्स विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.