नाशिक – नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तयारीच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पस मधील नियोजित जागेची पाहणी केली.यावेळी लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, सुभाष पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.यावेळी त्यांनी साहीत्य संमेलनाच्या सूक्ष्म नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.