सोलापूर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन. सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात त्यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.









