पुणे – ज्येष्ठ नेते, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार शामराव भीमराव पाटील (पानीवकर) यांचे निधन झाले. माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माळशिरसच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी काम केले. तालुक्यातल्या सहकार क्षेत्राला बळ दिले. माळशिरसच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य, दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. प्रकाश पाटील आणि डॉ. सुनील पाटील हे त्यांचे दोन सुपुत्र आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!