नाशिक – महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतांना भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार वसंत गीते व सुनील बागुल हे दोन मोठे नेते शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मातोश्री येथे ५ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. गुरुवारी खा. संजय राऊत नाशिकला आले होते. दिवसभर त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांची उदघाटन झाली. सायंकाळी त्यांनी एका लग्नसोहळ्यात हजेरी लावली. त्यानंतर रात्री त्यांनी या दोन नेत्यांशी एका हॅाटेलमध्ये चर्चा करुन या प्रवेश सोहळ्यावर शिक्कामोर्तब केले.