मुंबई – मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य सरचिटणीस गजानन थुल यांनी दिली. या निर्णयामुळे अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने केलेल्या लढ्याला यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
️कास्ट्राईब कर्मचारीकल्याण महासंघाने पदोन्नतीचे आरक्षण हा आमुचा संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्हांला मिळालाच पाहिजे या मागाणीसाठी महाराष्ट्र विधानसभेतील सर्व मंत्र्यांना भेटून निवेदने दिले होते. त्याच बरोबर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसाचे आंदोलन केले, नागपूर ते मुबंई लॉंगमार्च काढण्याचे नियोजन पूर्ण केले होते. त्याची पूर्वकल्पना दिली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांची अरुण गाडे यांनी नाशिक येते भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मंत्रीमंडळात चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री गटाची स्थापना करण्यात यावा असा प्रस्ताव शासनाकडे कास्ट्राईबच्या तर्फे मांडला होता. आज अखेर महाराष्ट्र शासनाने मंत्री गटाची स्थापना केली.
पदोन्नतीच्या आरक्षणाचा संघर्ष अद्याप संपलेला नाही .परंतु, आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर दबाव आणून आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यात कास्ट्राईब यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पदोन्नतीच्या आरक्षणाचा संघर्ष अद्याप संपलेला नाही .परंतु, आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर दबाव आणून आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यात कास्ट्राईब यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.