नाशिक – मांजात अडकलेल्या कबुतरची पक्षी मित्रांच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.
नायलॉन मांजा मध्ये अडकून कबुतर पक्षी जखमी झाल्याची घटना घडली. स्थानिक रहिवासी स्वप्नील जोशी यांनी त्वरित अग्निशमन दलाला फोन वरून माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान यांनी त्वरित घटनास्थळी येऊन मांजा मध्ये अडकलेल्या कबुतर पक्षीला सुखरूपपणे बाहेर काढून जीवदान दिले.
माऊलीलॉन्स रस्त्यालगत असलेल्या स्पेक्ट्रम आपर्टमेंट मधील नारळाच्या झाडावर जोशी यांना रविवार सकाळी ८ वाजता कबुतर पक्षी नायलॉन मांज्यामध्ये अडकलेला दिसला. याबाबतची माहिती त्यांनी त्वरित अग्निशमन विभागाला दिली. सिडको अग्निशमन दलाचे जवान इस्माईल काझी, फायरमन अवीनाश सोनावणे, संजय गाडेकर, कांतीलाल पवार हे त्वरित घटनास्थळी हजर होऊन घराच्या टेरेसवर आकड़ीबांबूच्या मदतीने कबुतराला जवळ ओढून त्याच्या मानेतून नायलॉन मांजा मोकळा करुन घेत कबूतराला मुक्त केले. सरकारने कागदोपत्री मांजावर बंदीही आणली आहे . प्रत्यक्षात मात्र आजही शहरात मांजा विक्री होताना यानिमित्ताने दिसत आहे.