नाशिक – महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे लॉं कॉलेज आणि पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने “महिला अधिकारांचे गांभीर्य ” याविषयी राष्ट्रीय पातळीच्या वेबिनारचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी ११.३० वाजता हे वेबिनार होईल.
महिला संरक्षणाचे कायदे असतांना देखील २१व्या शतकातही खरच महिला सुरक्षित आहे? हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याच ज्वलंत विषयवार सर्वांचे प्रबोधन व्हावे, महिलांना अधिकारांची माहिती व्हावी, गरजू महिलांना मदत मिळावी या हेतूने राष्ट्रीय पातळीच्या वेबिनारचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.
वेबीनारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून सुप्रसिद्ध वकील डॉ. अमी यजनिक या उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ. पूनम सोनवणे, उपप्राचार्य दिपक दंडवते हे नियोजन करीत आहेत. हे वेबीनार झुम अँप्लिकेशनवर होणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी लिंक व अन्य माहिती अशी
Meeting ID: 822 7355 6560
Passcode: 274813