नवी दिल्ली – व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यातही महिलांमध्ये हे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे पुढे आले आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना हृदयरोगाची समस्या सर्वात जास्त भेडसावत आहे. विशेषतः महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक असल्याचे एका अहवालानुसार आढळून आले आहे.
हृदयविकाराच्या बाबत महिलांनी अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे. या संदर्भात एका आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा झटका अधिक जाणवत आहे.
दरवर्षी ४.२५ लाख प्रकरणे
एका अहवालानुसार, दरवर्षी ४ लाख २५ हजार महिलांना हृदयविकाराचा झटका बसतो, हे प्रमाण पुरुषांपेक्षा ५५ हजारांनी जास्त आहे. तसेच अनेक स्त्रिया उपचाराअभावी मृत्यूच्या दारात गेल्या आहेत किंवा याची जाणीव नसल्यामुळे त्यांना हे विकार वाढत आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे तसेच कर्करोग, एचआयव्ही एड्स आणि मलेरियामुळे मरण पावणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे.
महिलांना याची माहित नसते
पुरुषांना हृदयविकाराचा झटका, म्हणजे छातीत तीव्र दुखणेची लक्षणे आढळतात. परंतु स्त्रियांमध्ये असे काही लक्षणे आढळत नाही. कधीकधी त्यांना १ ते २ वेळा हृदयविकाराचा झटका देखील समजत नाही. मात्र जबड्यात वेदना, जास्त घाम येणे, छातीत जळजळ होणे ही महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची मुख्य लक्षणे आहेत.
रजोनिवृत्ती हे त्याचे कारण
साधारणतः ४० ते ५० वर्षांच्या महिलांना सर्वाधिक धोका असतो, कारण रजोनिवृत्ती हे हृदयविकाराचा झटका येण्या मागील कारण आहे. त्यामुळे या वयोगटातील स्त्रियांनी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्वाच्या टिप्स :
-
आहारातून तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टींचे प्रमाण कमी करा.
-
तंदुरुस्त आणि बारीक राहण्यासाठी यावेळी दररोज बॉडी मसाज करा.
-
रोज व्यायाम आणि योगा करण्याची सवय लावा.
-
वजन, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा.
-
पुरेशी झोप घ्यावी. म्हणजे सुमारे ८ तासांची झोप खूप महत्वाची आहे.
-
जास्त चिंता आणि तणावपासून नेहमी दूर रहा.
-
पायर्या चढणे, चालणे, यासारखे उपक्रम जीवनशैलीचा भाग बनवा.
-
अल्कोहोल, साखर, बाटलीबंद शितपेय, सिगारेट पूर्णपणे टाळा.