मुंबई – राज्यात २० जानेवारीपासून किमान तपमानात घट होणार आहे. विदर्भात काही ठिकाणी १० अंश, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागात हे तपमान १४ अंश तर मुंबई, ठाणे येथे १६ अंश सेल्सिअल पर्यंत तपमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.