नाशिक – ऑटोमोबाईल क्षेत्रातील मदर इंडस्ट्री म्हणून ओळख असलेल्या सातपूर येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील महिंद्र अँड महिंद्र एम्प्लॉईज या अंतर्गत युनियनची त्रैवार्षिक निवडणूक येत्या १३ फेब्रुवारीला होत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. ३०) कंपनीमध्ये नोटीस लावत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
१७ जुलै २०२० रोजी मागील युनियनचा कार्यकाळ संपला होतो.परंतु कोविड १९ च्या पार्श्वभूमी मुळे निवडणूक घेण्यास परवानगी दिली जात नव्हती. परंतु शासनच्या जाहीर झालेल्या नवीन नियमावली मुळे निवडणुकीस परवानगी मिळाली आहे. १३ फेब्रुवारी २०२१ ते १२ जानेवारी २०२४ या त्रैवार्षिक कार्यकाळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एकूण ८ पदाधिकारी व कमिटी सदस्य पदासाठी निवडणूक होणार असून , एकूण २ हजार २०० सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक कालावधी मध्ये सर्व सभासदांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे व शांतपणे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांतपणे यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती अध्यक्ष योगेश चव्हाण, जनरल सेक्रेटरी सोपान शहाणे, सेक्रेटरी पं.सि.कानकेकर यांनी केली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
– उमेदवारी अर्ज विक्री – ३ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
– उमेदवारा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – ५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत
– उमेदवार अर्जाची छाननी अंतिम तारीख – ६ फेब्रुवारी २०२१
– अंतिम यादी जाहीर करण्याची तारीख – ८ फेब्रुवारी २०२१
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत
– पात्र उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध – १० फेब्रुवारी २०२१
– निवडणुकीसाठी मतदान दिनांक – १३ फेब्रुवारी सकाळी ७ ते सायं. ५ वाजेपर्यंत
– मतमोजणीची तारीख व वेळ – १३ फेब्रुवारी रोजी मतदान संपल्यानंतर
– निकाल जाहीर करण्याची तारीख व वेळ – १३ फेब्रुवारी २०२१ रोजी मतमोजणी नंतर