नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) रोजी महावितरण मध्ये प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झाल्या,त्यानिमित्त विद्युत भवन येथील सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शुक्रवारी परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार जळगावचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी स्वीकारला आहे.
२० ऑगस्ट २०२० रोजी रंजना पगारे नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी रुजू झाल्या होत्या. यापूर्वी त्यांनी महावितरणमध्ये विविध ठिकाणी विविध पदावर सेवा बजाविली होती. तत्कालीन महामंडळ आणि महावितरण मध्ये ३२ वर्ष २ महिने प्रदीर्घ सेवा देऊन त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. तरी याप्रसंगी त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे पालन करीत अल्प संख्येत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुछ देऊन गौरव करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली, संजय खंडारे आणि रमेश सानप, सहाय्यक महाव्यवस्थापक(मांस) महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, अनिल थोरात व उपव्यवस्थापक सुधा बाजपेयी यांनी त्यांच्या कार्य व कर्तृत्त्वाबद्दल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ. संजयकुमार पगारे, प्रभारी सहाय्