मुंबई – महाविकास आघाडीत मतभेद असले तरी तिघामध्ये चांगला समन्वय आहे. चांगले काम व्हावे हीच आमची भावना आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाऴासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. समान किमान कार्यक्रमावर आमचा भर असून कोणताही निर्णय आम्ही एकमताने घेतो, असेही थोरात म्हणाले. टाळेबंदीमुळे महसूल कमी झाला असून वस्तू आणि सेवा कराच्या कमतरतेमुळे अर्थ खात्याला अडचणी असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.