मुंबई – महाविकास आघाडी सरकारने बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते चेंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या नेत्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नेत्यांना देण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या ताफ्यातील बुलेट प्रुफ गाडीही काढण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम व अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहे. राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भात नुकतीच बैठक घेतली. कोरोनामुळे पोलिसांवर मोठा ताण आला असून तो कमी करण्यासाठी नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या निर्णयाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत असल्याचे भाजप नेते राम कदम आणि केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil , @mipravindarekar यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे.
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) January 10, 2021