नाशिक – महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ प्रदेश कार्यकारीणीची बैठक २६ जानेवारी रोजी, मखमलाबाद नाका येथील उदय कॉलनीतील सेन सभागृहात प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत प्रभाकर फुलबांधे, दिलीप अनर्थे, सयाजी झुंजार,सुनिल पोपळे,शाम अवसकर, विलास सुर्यवंशी, विकास मदने ,विष्णु वखरे,प्रवीण सावरकर,सोमनाथ सांळुके,लक्षण धाकतोंडे,अंबादास पाटील, , अभिजित बने, नारायणराव यादव, आप्पा सुर्यवंशी, विकास मदने,आरुण सैंदाणे,दिलीप जाधव, संजय गायकवाड,अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, बाळासाहेब व्यवहारे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, रमेश सस्कर, संजय बिडवे, वैभव बिडवे, जळगाव विभागीय अध्यक्ष तात्या सैंदाणे, जिल्हा अध्यक्ष कांती भाऊ वाघ,जगन वखरे,आदी राज्याचे प्रमुख पदाधिकारींच्या उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेना महाराज प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. बैठकीत
मागील मीटिंगचे इतिवृत्त वाचून त्यावर व समाजातील विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. विभागीय शाखा जिल्हा शाखांचे संघटन व पुनर्बांधणी याबाबत विविध तीन टप्पे पाडण्यात आले. यानुसार कार्यकारिणीने आपले कार्य करावे असे या बैठकीत ठरवण्यात आले. प्रास्ताविक संजय गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन तुषार बिडवे यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर बोराडे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष (ग्रा.) जगदीश सोनवणे, गणेश जाधव,रमेश आहेर,नाशिक महानगर प्रमुख नाना वाघ,युवा महानगर प्रमुख ज्ञानेश्वर बोराडे सरचिटणीस तुषार बिडवे अरविंद देसाई,आशोक ईशी,शिरीष जांभळे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप बोरसे, दीपक मगर,राजु कोरडे,संतोष वाघ,किरण शिंदे, करण सुर्यवंशी, आरूण कडवे,केदारनाथ गायकवाड, सुनिल कदम, विलास सुर्यवंशी, पदाधिकार्यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.बैठकीला नाशिक जिल्ह्यासह राज्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.