भुसावळ – महाराष्ट्र मधून कर्नाटक राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR Negative रिपोर्ट अनिवार्य भुसावळ विभागातील महाराष्ट्र मधून कर्नाटक राज्य मध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता यात्रा करण्यापूर्वी ७२ घंटे आधी कोविड ची RT-PCR Negative रिपोर्ट प्रवास करताना सोबत ठेवावी लागणार आहे.
गाडी क्रमांक 02780 हजरत निजामुद्दीन वास्को दि गामा, गाडी क्रमांक 02630 हजरत निजामुद्दीन यशवंतपूर , गाडी क्रमांक 06528 न्यू दिल्ली बेंगलोर, गाडी क्रमांक 06524 हजरत निजामुद्दीन यशवंतपूर , गाडी क्रमांक 09302 डॉ आंबेडकर नगर यशवंतपुर या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टेस्ट रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.