मुंबई – महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर उभा आहे. कोरोनाला टाळणे आपल्याच हाती आहे. कृपा करुन सर्व नियम पाळा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी आज राज्यातील जनतेशी ऑनलाईन माध्यमातून आज रात्री आठ वाजता संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढून दुसरी लाट येणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात, काय निर्णय काय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे
- करुन दाखविल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही
- महाराष्ट्राने प्रत्येक लढ्यात यश मिळविले आहे
- राज्यातील जनतेने संयमाने उत्सव साजरा केला.
- शिवतीर्थावरही आपण साध्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन पाळला.
- राज्यातील जनता खंबीरपणे सरकारला साथ देत आहे.
- दिवाळीत फटाके अत्यल्प प्रमाणात फोडण्यात आले. ही बाब सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.
- माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम यशस्वी झाली. सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन व आभार
- महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा या मोहिमेत तयार झाला
- धर्मस्थळांमध्ये गर्दी करु नका. नियम पाळा
- कोरोनाचा प्रादुर्भाव आपण रोखला पण आता अधिक काळजी घ्यावी लागेल
- कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही
- कोरोनाची लाट अनेक देशात तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले आहे.
- परराज्यातील अनेक शहरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे.
- सरकारी यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण आहे. तरीही ते कर्तव्य बजावत आहेत.
- कृपा करुन नियम पाळा. मास्क घाला. सॅनिटायझर वापरा. सतत हात धुवा. दोन हात अंतर ठेवा.
- ज्येष्ठ नागरिकांना कोरोना घातक आहे. त्यांची काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य
- अद्यापही कोरोनाची लस आलेली नाही. कधी येणार हे निश्चित नाही
- २४ ते २५ कोटी जनतेला लस देणे हे मोठे आव्हान आहे.
- कोरोनाचे शरीराच्या विविध भागांवर विपरीत परिणाम होत आहेत.
- कोरोनाचे नंतरही अनेकांना दुष्परिणाम भोगावे लागत आहेत
- अद्यापही अनेक जण गर्दी करताय आणि मास्क घालत नाहीत, हे गंभीर आहे
- आपल्याला काळजी घेत पुढे जायचे आहे.
- शिर्डीत प्रचंड गर्दी झाल्याचे वृत्त मी पाहिले. कृपया असे करु नका.
- पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू करा, अनेकांची सूचना व मागणी आहे
- कायदे करुन सर्व काही होणार आहे का
- आवश्यकता असेल तरच बाहेर पडा
- लक्षणे दिसत असतील तर आवर्जून चाचणी करा
- दिल्ली, अहमदाबादसह अनेक शहरात मोठी लाट आली आहे
- मोठ्य संख्येने रुग्ण झाले तर आरोग्य यंत्रणा कोलमडेल आणि सर्व हाताबाहेर जाईल, असे होऊ देऊ नका
- स्वतःहून कोरोनापासून चार हात लांब रहा
- सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यंत्रणा सज्ज आहे