अशा प्रकारची सुविधा देणारे राज्यातील पहिलेच चेंबर
उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई – आयात-निर्यातीसाठी लागणारे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन देण्याची सुविधा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता हा समारंभ झाला.
चेंबरचे कार्य कौतुकास्पद असून या सुविधेचा मोठ्या संख्येने उद्योजक व व्यावसायिकांना लाभ होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. या समारंभ प्रसंगी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अडचणी अनेक आहेत. मात्र राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहे. महापरवाना, महाजॉब, उद्योगमित्र, नवीन औद्योगिक क्षेत्राची निर्मिती या चार ४ योजना सुरु केल्या आहेत. महापरवाना मध्ये ४८ तासात नवीन उद्योगांना परवानगी देण्यात येते. महाजॉबमध्ये आतापर्यंत १० हजार उद्योगांनी नोंदणी केली असून २ लाख तरुणांनी नोंदणी केली आहे. काम देणारा आणि काम मागणारा दोघांची इथे नोंदणी होते. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळेल. उद्योगमित्र मध्ये एक अधिकारी आम्ही नेमला असून उद्योगांना गुंतवणूकीसाठी उपलब्ध करून दिला आहे, असे देसाई यांनी सांगितले.
काळे लॉजिस्टिकच्या सहकार्याने या सुविधेची सुरुवात करण्यात आली असून त्याची माहिती व कार्यपद्धती चित्रफितीद्वारे काळे लॉजिस्टिक सीइओ अमोल मोरे यांनी दिली. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उमेश दाशरथी, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलिका आदींसह यांच्यासह व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.