मुंबई – येत्या ६ एप्रिलपासून होणारे इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल होणार की नाही, असा प्रश्न महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊननंतर विचारला जात आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातच कोरोनाचा प्रुर्भाव वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. अखेर यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टता केली आहे. ते म्हणाले की, ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयपीएल होणारच आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच, कोट्यवधी गुंतवणूकदारांनाही दिलासा मिळाला आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1378745062419353605