मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रावरच कोरोनाचे प्रेम आहे का, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोना का वाढत नाहीय, असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्याची मोठी चर्चा सध्या होत आहे. केंद्र सरकारने जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार, तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. अन्य राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव काहीसा कमी आहे. त्यामुळेही देशपांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सध्या जोरदार चर्चा आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1371648273044271107