नवी दिल्ली – महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अतिशय चिंतानजक असून हा ट्रेंड खरोखरच विचार करायला लावणारा असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव आणि निती आयोगाचे आरोग्य क्षेत्राचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटले आहे. सातत्याने महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
कोरोना विषाणूला बिल्कुल गृहित धरु नका. संपर्कात आलेल्यांना शोधून चाचण्या वाढविणे आवश्यक असल्याचे डॉ. भार्गव यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे कसोशीने पालन होणे आवश्यक आहे, असे डॉ. पाल यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1369967112467353601
https://twitter.com/ANI/status/1369965753827389440